कोरोनाने अर्थव्यवस्था गाळात रुतवून टाकली, रोजगार आटले वगैरे खरं असलं तरी काही क्षेत्रांना हि आपत्ती इष्टापत्ती ठरलेय.अगदी ज्या काळात मार्केट निच्चांक नोंदवत होता तेव्हा काही उद्योग मात्र भरभराट करत होते.अशीच एक कंपनी आहे “इंटलेक्ट डिझाइन एरेना” (Multibagger stocks in marathi)
हि चेन्नईस्थित कंपनी आयटी क्षेत्रातील सेवा पुरवणारी कंपनी असून तिच्या सेवा मुख्यत्वे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत.
पाहूया कंपनीच्या समभागाने वर्षभरात किती परतावा दिला आहे.
इंटलेक्ट डिझाइन एरेना. Intellect Design Arena Ltd.
25 मार्च 2020 रोजी बंद दर: ₹ 44.85
आज उच्चांक दर: ₹693.45
आजचा बंद दर: ₹677.95
वर्षभरात 1400% पेक्षा जास्त परतावा.
म्हणजेच वर्षभरात गुंतवणूक १४ पटीत वाढली.
आकड्यांच्या गंमतीत सांगायचं तर या समभागात मागील वर्षी मार्च महिन्यात गुंतवलेले सात लाख रुपये आज एक कोटी पाच लाख झालेत.