Image Credit: Internet |
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 15 एप्रिल रोजी आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सरत्या आर्थिक वर्षात कोविडमुळे लॉकडाऊन सारख्या स्थितीला सामोरं जावं लागलं असलं तरी कंपनीने मात्र अनेक चांगले सौदे, करार-मदार करत ऑर्डर्स मिळवल्या होत्या यामुळे इन्फोसिसचे निकाल चांगले लागण्याचा अंदाज अनेक ब्रोकरेज संस्था तसेच तज्ज्ञांनी वर्तवला आहे. (infosys quarterly results in marathi)
6 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये आर्थिक वर्ष 2021 मध्ये 114 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे त्याच बरोबर मार्च महिन्यात संपलेल्या चौथ्या तिमाहीत या शेअरमध्ये 8.9 टक्क्यांची वाढ झालेय.