Image Source : Internet |
भारताची आघाडीची आयटी कंपनी टिसीएसचे चौथ्या तिमाहीचे निकाल आज जाहीर झाले. गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 14.9 % नी वाढ झालेय.कंपनीला गेल्या मार्च अखेरीस संपलेल्या चौथ्या तिमाहीत एकत्रित रु.9,246 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. (TCS dividend update in marathi)
कंपनीच्या उत्पन्नातही वार्षिक तत्वावर 9.4 % ची वाढ होऊन तो रु. 43,705 कोटी इतका झाला आहे. कंपनीच्या डिजिटल सेवांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे कंपनीला चांगला नफा झाल्याचा अंदाज आहे.
भागधारकांसाठी चांगली बातमी म्हणजे कंपनीने रु.15 प्रती समभाग लाभांश ( डिव्हीडेंड ) जाहीर केला आहे.