साखरेच्या शेअर्समध्ये तेजी का ? Rally in Sugar stocks.
Photo by Sonika Agarwal on Unsplash |
साखरेचे शेअर्स गोड ? Rally in Sugar stocks.
गेले काही दिवस आपण पाहतोय साखर उत्पादक कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळतेय. (Rally in Sugar stocks) आज दुपारच्या सत्रात त्यात काहीशी घट दिसत असली तरी मागील काही कालावधीत बजाज हिंदुस्तान,धामपुर शुगर मिल्स, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज,अवध शुगर अँड एनर्जी, उत्तम शुगर मिल्स वगैरे अशा बऱ्याच साखर कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूक दारांना चांगला परतावा मिळवून दिलाय.
असं काय झालंय की गुंतवणूकदारांना साखरेत रस निर्माण झाला ?
याचं मुख्य कारण जागतिक बाजारात साखरेच्या उत्पादनात झालेली घट. युरोपियन युनियन , थायलंड आणि ब्राझील सारख्या देशांत साखरेच्या उत्पादनांत मोठी घट झाली आहे आणि परिस्थितीचा फायदा भारतीय कंपन्यांना होऊ शकतो.तसेच देशांतर्गतसुद्धा साखरेच्या किंमतीत महिन्याभरात जवळपास 6 – 8 % नी वाढ झाली आहे. यामागचं कारण म्हणजे इथेनॉलच्या उत्पादनासाठी वाढलेली उसाची मागणी.
Image by Corinna Schenk from Pixabay |
एकंदरीत काय कि साखर उत्पादक कंपन्यांना यामुळे बरे दिवस आले आहेत. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.