ऑफर फॉर सेल म्हणजे काय ? (what is Offer For sale in marathi)            

बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, वाचतो कि एखादी कंपनी आयपीओ आणत आहे. त्यातून अमुक इतका निधी कंपनी जमा करणार आहे. तसंच त्याच बरोबरआणखी काही निधी कंपनी ऑफर फॉर सेल म्हणजे OFS मधून जमा करणार आहे. पण हे ऑफर फॉर  सेल ( What is offer for sale in marathi ) म्हणजे काय ?
 
आयपीओ संकल्पना तर बऱ्याच जणांना माहित असेल.काहीजणांना OFS बद्दल सुद्धा माहित असेल.पण आज ज्यांना हे माहित नाही त्यांना आम्ही या प्रकाराबद्दल सांगणार आहोत.
 
OFS मध्ये सुद्धा कंपनी निधी जमा करते पण इथे सेबीच्या नियमानुसार कंपनीच्या संचालकांचा हिश्याचे शेअर्स विक्री करून कंपनीमधील त्यांची हिस्सेदारी कमी केली जाते. म्हणजे सोप्या भाषेत संचालकांच्या हिश्याच्या समभागांची विक्री करणे.

कोण खरेदी करू शकतात हे शेअर्स ?

तर सामान्य गुंतवणूकदार, फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेेस्टर्स (FPI), फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेेस्टर्स (FII), म्यूचुअल फंड्स, इंश्योरेंस कंपन्या, कॉर्पोरेट्स, इतर क्वॉलिफाइड इंस्टीट्यूशनल बिडर्स, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) तसेच अनिवासी भारतीय OFS साठी अर्ज करू शकतात.

कसं करतात अर्ज : ( How to apply for OFS )

OFS साठी अर्ज पद्धत नेहमीच्या शेअर्स व्यवहाराप्रमाणे नसली तरी  ब्रोकरमार्फतच असते. यासाठी अर्ज  ब्रोकरकडून पुरवल्या गेलेल्या बिडिंग प्लॅटफॉर्मद्वारे करता येतं. म्हणजे काही ब्रोकर त्यासाठी ट्रेडिंग सारखी ऑनलाईन सुविधा देतात तर काही ब्रोकरकडे कॉल एन्ड ट्रेडद्वारे आपली बोली लावता येते. IPO आणि FPO प्रमाणे OFS मध्ये कोणताही फॉर्म इश्यू होत नाही.
 
  • OFS मध्ये तुम्ही शेअर्स साठी कोणत्या किंमतीची बोली लावली आहे यावर तुम्हाला शेअर्स प्राप्त होणे न होणे अवलंबून असतं.
  • OFS बिडिंग मध्ये ट्रान्सेक्शनल आणि STT चार्जेस वगळता इतर कोणतेही चार्जेस नसतात.
  • OFS मध्ये प्राइज बिडिंग झाल्यावर लगेच अलॉटमेंट होते आणि त्याच दिवशी एलोकेशनसुद्धा होऊन जातं.
 
माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *