शेअर मार्केटचा विषय असला कि अनेक बाबतीत उत्सुकता चाळवली जाते. म्हणजे अनेकांना कफल्लक करून गेलेला शेअर, तसंच अनेकांना थोड्याच कालावधीत शाही जीवनशैली मिळवून देणारा शेअर, अशा अनेक गोष्टी या क्षेत्रात ऐकायला वाचायला मिळतात. आज अशीच एक माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय , ती म्हणजे भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडे शेअर्स कोणते ? ( Most Expensive Stocks in India )

बरेचदा काय होतं अनेक कंपन्या आपला समभाग विभागण्याचा ( Stock Split ) निर्णय घेत नाहीत. म्हणजे शेअरची जी किंमत आहे ती आहे त्या नुसार वाढू देतात. त्यामुळे अशा अनेक शेअर्सची किंमत अवाढव्य वाढते. अर्थात वाढते म्हणजे त्यामागे कंपनीची उद्योग धोरणे, व्यवसाय वृद्धी अशी करणे असतातच.

यापूर्वी आपण शेअर मार्केटसंदर्भातील अनेक वेगवेगळ्या अंगांनी माहिती करून घेतलेय कधी लाखाचे बारा लाख करणारा शेअरबद्दल तर कधी शेअर्सची डीलिस्टिंग मागील गणित समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आज आपण अशाच काही शेअर्सची माहिती करून घेणार आहोत. जे भारतीय भांडवली बाजारातील सर्वाधिक किंमत असलेले शेअर्स ( Most Expensive Stocks ) आहेत. आपण हि माहिती खालुन वर अशा क्रमाने पाहू म्हणजेच सर्वाधिक किंमत असलेला शेअर ( most expensive share in India ) सर्वात शेवटी अशा प्रकारे.

Most Expensive Stocks Explained in Marathi

भारतातील सर्वात महागडे शेअर्स.

  • बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड Bombay Oxygen Investments Ltd. (आजचा बंद भाव ₹ 13894 ) : खरं तर कंपनी औद्योगिक वायू निर्मिती क्षेत्रातील पण उत्पन्नाचा जवळपास 50 % भाग इतर गुंतवणूक स्त्रोतांमधून येत असतो. उदाहरणार्थ शेअर्स , म्युच्युअल फंड्स वगैरे.

  • बॉश लिमिटेड Bosch (आजचा बंद भाव ₹ 15025) : मूळ जर्मन कंपनीची भारतातील हि उपकंपनी ऑटो कॉम्पोनेंट्स उत्पादन क्षेत्रात आहे.

  • टेस्टी बाइट्स Tasty Bite Eatables (आजचा बंद भाव ₹ 17084) : तयार पाकीटबंद स्नॅक्स खाद्यपदार्थ बनवणाऱ्या या कंपनीची वाढ गेल्या काही वर्षांत वेगात झाली आहे. कंपनी आता फ्रोझन खाद्यपदार्थ क्षेत्रात सुद्धा उतरली आहे.

  • एबॉट इंडिया Abbott India (आजचा बंद भाव ₹ 16809 ) : औषध निर्मिती क्षेत्रातील अमेरिकन कंपनी भारतातीलही वेगाने वाढणाऱ्या औषध कंपन्यांपैकी एक आहे.

  • नेस्ले इंडिया Nestle India Ltd. (आजचा बंद भाव ₹ 17633 ) : कीटकॅट आणि मॅगी या लोकप्रिय उत्पादनांसाठी ओळखली जाणारी भारतीय बाजारपेठेतील एक जुना खेळाडू म्हणून ओळखली जाते.

  • थ्री एम इंडिया 3M India (आजचा बंद भाव ₹ 24332) : 1987 सुरु झालेली हि कंपनीची स्क्रॉचब्राईट, पोस्ट-इट्स हि ओळख बनवून असणारी उत्पादने आहेत.

  • श्री सिमेंट Shree Cements (आजचा बंद भाव ₹ 27505 ) : नावातूनच कंपनीच्या उद्योग व्यवसायाची माहिती होते. वर्ष 1979 पासून सुरु झालेली हि कंपनी तिच्या बांगूर सिमेंट , रॉकस्ट्रॉंग सिमेंट या उत्पादनांसाठी ओळखली जाते.

  • पेज इंडस्ट्रीज Page Industries (आजचा बंद भाव ₹ 29522 ) : अंतवस्त्रे निर्मिती क्षेत्रातील या कंपनीची वाढ वाखाणण्याजोगी राहिलेय. जॉकी हे या कंपनीचं लोकप्रिय ब्रँड.

  • हनीवेल ऑटोमेशन Honeywell Automation (आजचा बंद भाव ₹ 41831 ) : 1987 मध्ये टाटा समूह आणि हनीवेल ची अमेरिकेतील मूळ कंपनी यांनी मिळून स्थापना केलेली सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या साह्याने व्यवसाय वाढीस उपयुक्तसेवा पुरवणारी हि कंपनी.

  • एमआरएफ MRF (आजचा बंद भाव ₹ 80079 ) : सचिन तेंडूलकरच्या कारकीर्दीच्या सुरवातीच्या दिवसांत त्याच्या बॅटवर असलेलं ते लक्ष वेधून घेणारं स्टीकर आठवतंय ? मग दोन हातांनी टायर वर उचलून धरणाऱ्या पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषाची प्रतिमा असलेलं कंपनीचं ते अधिकृत चिन्ह सुद्धा आठवत असेलच. MRF अर्थात मद्रास रबर फॅक्टरी हि भारतातील सर्वाधिक किंमत असलेला शेअर (Costliest share in India ) म्हणून ओळखली जाते. टायर हे कंपनीचे मुख्य उत्पादन असलं तरी क्रीडा साधने, रंग, खेळणी हि सुद्धा कंपनीची इतर उत्पादने आहेत.

तर हे होते भारतातील सर्वात जास्त किंमत असणारे शेअर्स (Most Expensive Stocks in India) . माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *