What is e-rupi digital PaymentWhat is e-rupi digital Payment

ई -रुपी डिजिटल पेमेंट प्रणाली आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरवात केली जाणार आहे.आजच्या लेखात जाणून घेऊया ई -रुपी डिजिटल पेमेंट म्हणजे नक्की काय आहे. (What is e-rupi digital Payment) 

मित्रांनो आपण बरेचदा वाचतो ऐकतो, लाभार्थ्यांना सरकारकडून शासनाकडून विविध प्रकारची मदत जाहीर केली जाते त्यानंतर मदत जाहीर करण्यापासून ती मदत थेट लाभार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत किंवा बँक खात्यात येईपर्यंत मध्ये बराच काळ जातो ज्यामध्ये लाभार्थ्याला अक्षरशः वाट पाहावी लागते किंवा पूर्वी-पूर्वी तर शंभर रुपये लाभार्थ्याला मिळणार असतील तर ते त्याला प्रत्यक्षात मिळणारी रक्कम पंचवीस – पन्नास अशी किरकोळ असायची. म्हणजे या रकमेचा काही भाग मधल्या-मध्ये  गायब व्हायचा. बरेचदा तर अनेक नकली लाभार्थी कागदोपत्री उभे केले जायचे जो एक मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार होता.

यामुळे व्हायचं काय तर सरकारचा पैसा योग्य प्रकारे वापरला जायचा नाही.लाभार्थ्यांना सुद्धा त्यांची हक्काची रक्कम मिळायची नाही. परंतु यावर आता एक चांगला पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे जो आहे ई -रुपी नावाचे डिजिटल पेमेंट (e-Rupee Digital Payment). हे नेहमीच्या डिजिटल पेमेंट प्रणालीपेक्षा थोडसं वेगळ आहे. ते कसं हे आपण आता पाहू या.

नक्की काय आहे ई -रुपी ? (What is e-rupi in Marathi )

ई -रुपी एक असे ई व्हाउचर आहे ज्याची एक रक्कम किंवा किंमत निश्चित केलेली असेल जी पूर्वनियोजित अशा कारणासाठीच ( योजना वगैरे ) खर्च होईल. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत हे अधिक सुरक्षित म्हणता येईल.

हे एक प्रकारे सरकारी योजना लिंक्ड डिलिव्हरी म्हणजे कोणती गळती न होऊ देता राबवली जाण्यासारखे. कारण बरेच वेळा असं होतं की लाभार्थ्यांना ठरलेली रक्कम मिळतच नाही किंवा कमी मिळते. तसेच ती मदत मूळ लाभार्थ्यांना न मिळता इअतर कुणाला तरी दिली जाते. अशा गोष्टी टाळण्यासाठी ही  ई -रुपी  हा क्रांतीकारी पेमेंट प्रकार ठरू शकतो.  

पाहूया ई -रुपीचे स्वरूप कसं असेल आणि याद्वारे कोणकोणत्या योजना राबविल्या जाऊ शकतात. (How is e-rupee Used ?)


हे एक असं कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं स्वरूप QR कोड-आधारित किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर प्रकारचे असेल.  हे व्हाउचर जनरेट झाल्यावर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर पोहोचेल. आणि मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे हे  व्हाउचर कार्ड, डिजिटल पेमेंट एप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय रिडीम केले जाऊ शकते. म्हणजे यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची गरज नाही, अगदी प्राथमिक प्रकारचा फोने तुमच्या कडे असणे गरजेचे.

कोणकोणत्या योजनांचे पेमेंट राबवले जाऊ शकते हे पाहूया. ( Schemes are covered under e-rupee)

  • आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य.
  • टी बी अर्थात क्षयरोगासारख्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी असणाऱ्या योजना.
  • मातृ आणि बालकल्याण योजना तसेच इतर औषधोपचार संदर्भातील योजना.
  • खाद्य अनुदान म्हणजेच फुड सबसिडी.

अशा अनेक योजना ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांपर्यंत त्यांना निश्चित केलेली मदत पोहोचणे गरजेचं असतं जी ई-रूपी व्हाऊचरद्वारे सरकार सहज आणि उत्तम प्रकारे  करू शकेल.

आणि हो, हि प्रणाली फक्त सरकारी योजनांसाठी नाहीतर ती खासगी क्षेत्रासाठी सुद्धा ही फायदेशीर ठरेल कारण अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ई-रूपीचा करू शकतील.


ई-रूपी कसं काम करेल. ( How E-Rupee Works ?)


कोणत्याही योजनेत किंवा उपक्रमात सेवा देणारा सेवा पुरवठादार आणि लाभार्थी ही दोन केंद्रे असतात ज्यामध्ये सेवा देणाऱ्याकडून सेवेचा लाभार्थ्याला पुरवठा केला जातो. पण बरेचदा काय होतं की लाभार्थ्यांपर्यंत की सेवा किंवा ती शासकीय मदत योग्य वेळी पोहोचत नाही किंवा त्या आर्थिक मदतीची मध्येच गळती होण्याची शक्यता असते. अशा वेळी ई-रूपीमध्ये मात्र सेवा देणारा आणि लाभार्थी थेट एकमेकांना जोडलेले असतात. 

ई-रूपी हे एक रोखरहित तसेच  संपर्करहित डिजिटल पेमेंट माध्यम आहे जे लाभार्थीच्या मोबाईलवर हे थेट पाठवले जाते. यामध्ये कोणी अडते-नडते किंवा वेगवेगळे टप्पे नसतील. ई-रूपी हे  क्यू आर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग वर आधारित व्हाऊचर असणार ज्याद्वारे पेमेंट किंवा रिडीम करण्यासाठी कार्ड सेल किंवा फोन पे, गुगल पे सारख्या डिजिटल पेमेंट एपची (Digital Payment UPI App) गरज नाही. किंबहुना तुमच्या कडे स्मार्ट फोन आणि इंटरनेट असणेही गरजेचे नाही.


या पेमेंट प्रणालीमध्ये व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्विस प्रोव्हायडरला पेमेंट केले जाणार आहे म्हणजे व्हाऊचर लाभार्थीच्या मोबाईलमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ते लाभार्थीच्या मालकीचे आहे आणि ज्या वेळी लाभार्थी त्याचा वापर करेल. त्यानंतरच सर्विस प्रोव्हायडरचे पेमेंट होणार आहे.


ई-रूपी एक प्रकारे प्रीपेड रक्कम असण्यासारखं जीचा भरणा अगोदरच झालेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळा योजनेचे पेमेंट उशिरा होणे  वगैरे कारणे ह्या संदर्भात येणार नाही पेमेंट प्रीपेड आहे म्हणजे ज्याचा अगोदर त्याचा भरणा झालेला आहे त्यामुळे  व्हाऊचर  तुमच्याकडे आलं याचा अर्थ तुमच्याकडे पेमेंट आलेलं आलेलं आहे.


मित्रांनो ई-रूपी या डिजिटल पेमेंट प्रणाली थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा जेणे करून त्यांनाही या नवीन प्रणालीबद्दल माहित होईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *