‘कर्ज ‘ मुळात हा शब्दच गुंतवणूक या संकल्पनेच्या अगदी विरुद्धार्थी मानवा असा आहे. कर्ज जितकं कमी किंबहुना नाही तितकी आर्थिक स्थिती उत्तम असं मानलं जातं, आणि ते बऱ्याच अंशी खरंही आहे. कर्जाच्या सापळ्यात फसलेली मग ती व्यक्ती असो किंवा कंपनी ती फारच कठोर आर्थिक शिस्त लावल्यानंतरच त्यातून बाहेर पडू शकते. पण मुळातच कर्ज कधी आणि कसे घ्यावे (How to get a loan in marathi) हे बऱ्यापैकी माहित असेल तर अनेक गोष्ठी सुसह्य होतात.
‘कर्ज’ हा खरच अगदी वाईट मानावा असा प्रकार आहे का ?
अगदी स्पष्ट आणि थेट सांगायचं तर मुळीच नाही. कारण ‘चाकू’ असो किंवा ‘कुऱ्हाड’ हि आयुधं चांगली कि वाईट हे तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर ठरतं. आणि मुळातच या वस्तू आपली कामं सोप्पी करण्यासाठी म्हणजेच सोयीसाठी निर्माण झाल्यात पण एखादी व्यक्तीच जर त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या कामासाठी करत असेल तर दोष त्या वस्तूंना कसा देता येईल. अगदी असंच अर्थशास्त्रात ‘कर्ज’ या प्रकाराबद्दल म्हणता येईल.
कारण तुम्ही कर्ज नसणाऱ्या व्यक्ती, संस्था – कंपनी किंवा मग अगदी देश शोधायचा प्रयत्न केलात तर फारच कमी संख्यने तुम्हाला तशी उदाहरणे सापडतील ज्यांच्यावर कर्ज नसेल. जास्त दूर कशाला जा. रिलायन्सइंडस्ट्रीज सारख्या महाकंपनीवर कर्ज आहेच. आपलं महाराष्ट्र राज्य आणि अगदी देशावरही कर्ज आहेच. आपल्या भविष्याबाबत असणाऱ्या योजना कार्यक्षमपणे राबविण्यासाठी कर्ज हा पर्याय अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजेच तुम्ही कर्ज कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या अटींवर घेता हे खरंतर महत्वाचं आहे.
कारण जर कर्ज हा प्रकार नसता तर कदाचित अनेकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील असतं.
कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तत्पूर्वी स्वतःला खालील प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरं समाधानकारक असतील तरच कर्ज घेण्याचा विचार करा.
1 ) मी ज्या कारणासाठी कर्ज घेतोय ते फक्त मी आणि माझ्या कुटुंबाशी निगडीत आहे का ?
2 ) हे कर्ज माझी खरच गरज आहे का ? मी चैनीसाठी कर्ज घेत नाहीये ना ?
3) हे कर्ज घेण्याआधी मी काही कर्ज घेतले आहेत का ? असेल तर नवीन कर्ज परतफेड करण्याची माझ्याकडे काही व्यवहार्य योजना आहे का ?
4) कर्ज फेडण्याचा हफ्ता वगळता माझ्या हातात उरणारी रक्कम माझी-माझ्या कुटुंबाची दरमहिन्याची गरज भागविण्यास पुरेशी आहे का ?
5) या कर्जाची परतफेड करताना मी स्वतःवर काही आर्थिक निर्बध आणू शकतो का, जेणेकरून कर्जाची परतफेड करणे मला सुसह्य होईल.
6) सदर कर्जामुळे माझ्या गुंतवणूक योजनेवर परिणाम होईल का ? जर होणार असेल तर त्याबाबत माझी योजना काय आहे ?
7) माझं सध्याचं उत्पन्न स्त्रोत अचानक बंद झाल्यास पुढील काही महिन्यांसाठी मी आणीबाणी निधीची ( इमर्जन्सी फंड ) तरतूद केलेय का ?
8) कर्जासाठी मला द्यावा लागणारा व्याजदर हा त्या कर्ज प्रकारातील किमान व्याजदराच्या आसपास आहे का ?
वरील प्रश्नांची उत्तरे समाधानकारक म्हणजे तुमच्या नव्या कर्ज घेण्यासाठी अनुकूल येत असतील तरच तुम्ही कर्जाच्या पर्यायाचा विचार करा.
कर्ज कुठून घ्यावे ? Where to get a loan from ?
आज कर्ज देणारे अनेक पर्याय समोर येत आहेत म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा ठरतो.आज अनेक नवे फिनटेक एप्स आहेत जे क्रेडीट लाईनच्या गोंडस नावाखाली तुम्हाला कर्ज (Instant Loan, Personal Loan, Online Loan) देऊ करतात. त्यातील काही सुरवातीला व्याजरहित कालावधीचं गजर दाखवतात तर काही व्याजदरांचं.त्याबाबत सावधानता बाळगणे इष्ट.
मुळात कर्ज घेताना शक्यतो पहिली पसंती बँकांना असावी. त्यातही जर ती बँक सरकारी असेल तर उत्तमच पण सरकारी बँकांच्या अटींची पूर्तता करणे सर्वांना शक्य नसते. मग अशावेळी खाजगी बँकांचा पर्याय असतो. तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच एनबीएफसी (NBFC ) सुद्धा कर्जासाठी पर्याय आहेच.पण अशावेळी या संस्थांचे कर्जाच्या संदर्भात असलेली विविध शुल्क जाणून घ्यावीत, उदाहरणार्थ प्रोसेसिंग चार्जेस, गृह किंवा व्यवसाय कर्जप्रकार (Home Loan Or Business Loan) असेल तर कायदेशीर प्रक्रिया शुल्क (Legal Charges) तसेच हफ्ता देण्यास उशीर झाल्यास दंड म्हणून आकारले जाणारे शुल्क किती असेल. कर्ज अंशतः किंवा एकरकमी चुकता करता येण्याची सुविधा आहे का ते पाहावे आणि जर असेल तर त्यासाठीच्या अटीं आणि शुल्क समजून घ्यावे.
थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्यासाठी कर्ज हा उपाय आहे की अपाय हे तुमची गरज आणि तुमच्यासमोर असलेले पर्याय यातून घेतलेल्या निर्णयांवर ठरतं.
कर्ज घेण्याचा निर्णय पक्का असेल तर.. (How to get a loan in Marathi)
अनेकदा व्यक्ती कर्जाकरिता अनेक बँका किंवा वित्तीय संस्थांकडे स्वतंत्रपणे अर्ज करीत असतात जे काहीसं वेळखाऊ आहे मग अशावेळी काही संस्था अशा आहेत कि ज्याआपलं कर्जासाठीची चाचपणी एकाचवेळी अनेक बँका आणि वित्त संस्थांकडे करतात आणि त्यामधील पर्याय आपल्यासमोर ठेवतात.
नेमकी अशाच प्रकारची सुविधा आम्ही आपल्यासमोर आणीत आहोत ज्या द्वारे कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काहीशी सुसह्य होऊ शकेल. खालील फॉर्म भरल्यानंतर तुमच्या कर्जासाठीच्या चौकशी करिता तुम्हाला कर्ज समन्वयक संस्थेकडून संपर्क साधला जाईल जी एकाच वेळी अनेक नामांकित बँकां आणि वित्त संस्थांशी जोडलेली असते. सदर संस्था तुम्हाला इतर बँका आणि वित्त संस्थांद्वारे तुम्हाला कर्ज मिळवून देण्यास सहकार्य करेल.
खुलासा : सदर संस्था हि आम्ही स्थापलेली नसून एक त्रयस्थ संस्था असून जी कर्ज-अर्जदार व्यक्ती आणि बँक यांच्या दरम्यान मध्यस्थ तसेच समन्वयक म्हणून काम करते त्या करिता अर्जदाराकडून कोणतेही शुल्क घेत नाही. सदर संस्थेला तिचे शुल्क हे बँक किंवा वित्तसंस्थेकडून प्राप्त होते. सदर कर्ज प्रकरणात अर्जदार आणि या संस्थेची गाठभेट घालून देणे इतपत आमची भूमिका मर्यादित असेल.
कर्जासाठी विचार करताना आम्ही पुन्हा एकदा आपणांस सांगू इच्छितो कि ठोस कारण आणि गरज असेल तरच कर्ज या पर्यायाचा विचार करावा कारण आधी सांगितल्याप्रमाणे “कर्ज मिळणे सोप्पं होणं” हे कर्ज घेण्याचे कारण असू शकत नाही, हे लक्षात असुद्या.
कर्जाच्या चौकशीसाठी खालील फॉर्म भरावा. (Fill the form for Loan enquiry)