ruchi soya patanjali story in marathiruchi soya patanjali story in marathi

रुची सोया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली कंपनी( ruchi soya patanjali story in marathi ).  नुकताच तिचा FPO (Ruchi Soya FPO) पण आला. तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ होतेय. सध्या कंपनीचा समभाग रु. 952 वर बंद झालाय. ही तीच ‘रुचीसोया’ कंपनी आहे, जिचा स्टॉक कधीकाळी 15,000 रुपयांवर ट्रेड करत होता आणि कधी तर त्याची किंमत अवघी 3.5 रुपयांपर्यंत खाली आली होती. हे सगळं कसं आणि का झालं ते आज जाणून घेऊया.


अशी झाली कंपनीची सुरुवात. (How ruchi soya started in marathi )

याची मुहूर्तमेढ रोवली गेली 1963 मध्ये, जेव्हा पंतनगर आणि जबलपूरसारख्या विद्यापीठांमध्ये सोयाबीनवर संशोधन सुरू झाले होते. यानंतरच्या काळात मध्य प्रदेशपासून देशाच्या अनेक भागात सोयाबीनची लागवड होऊ लागली. याच संधीचा फायदा घेत दिनेश सहारा यांनी 1973 मध्ये सोयाबीनचा व्यवसाय सुरू केला (ruchi soya products). हा व्यवसाय सुरुवातीला फक्त सोयाचा होता, पण नंतर खाद्यतेलाचाही त्यात समावेश करण्यात आला.(Ruchi soya oil ) आणि बघता-बघता रुची सोया ही देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली.

कर्ज प्रकरण. (Ruchi Soya Loan)

कंपनीचा प्रवास इतका उत्तमप्रकारे सुरु झाला होता कि त्यावेळी खरंतर कुणी कल्पनाही केली नसेल ही कंपनी कधी अपयशीही ठरेल, परंतु तसं झालं खरं.त्याचं झालं काय कि इतर कंपन्यांप्रमाणे याही कंपनीने कर्ज घेतलं. कंपनीने 2010 ते 2015 दरम्यान सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कंपनीने हे कर्ज का घेतले याचं कारणच कंपनीला गर्तेत नेणारं ठरलं.

कारण त्या काळात म्हणजे ऑक्टोबर 2011 मध्ये इंडोनेशियाने पाम तेलावरील करशुल्क वाढवले, इंडोनेशिया म्हणजे जेथून रुचीसोया पाम तेल खरेदी करून नंतर त्याचं शुद्धीकरण करत असे.पण आता मूळ निर्यातदाराने शुल्कात वाढ केल्यामुळे साहजिकच निर्मिती मूल्य वाढलं आणि त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ करणे रुची सोयाला भाग पडलं. दुसरीकडे, त्याच वेळी इंडोनेशियाने रिफाइंड तेलावरील शुल्क मात्र कमी केले, ज्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांन रुची सोयाकडून तेल घेण्याऐवजी इंडोनेशियन तेल खरेदी करण्याचा शहाणपणाचा व्यवहार पसंत केला.

कंपनीचे दिवस फिरले ते इथून. ( The turning Point of Ruchi soya )

अशा स्थितीत आपल्या हक्काचा बाजार हातातून निसटून जात असल्याचे पाहून रुची सोयानेसुद्धा नफ्याचं मार्जीन कमी ठेवत स्वस्तात तेल देण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर माल विकला की पैसे द्या, अशीही क्रेडिटची सुविधा सुद्धा  ग्राहकांना देऊ केली. हा आर्थिक ताण सहन करण्यासाठीच कंपनीने ते कर्ज घेतले होते. यामुळे लवकरच, कंपनीचे सुमारे 5,000 कोटी रुपये बाजारात अडकले. ज्यांनी कंपनीकडून उधारीवर माल घेतला त्यांनी पैसे देताना चुकवेगिरी केली आणि दुसरीकडे बँकांनी आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी कंपनीकडे तगादा लावला.

याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि कंपनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात (NCLT) गेली आणि मग दिवाळखोरी प्रक्रिया सुरू झाली.

किरकोळ गुंतवणूकदार बुडाले. ( Retail Investors loss in Ruchi soya )

दिवाळखोरीचा परिणाम म्हणून मग वर्ष 2019 मध्ये जेव्हा कंपनी शेअर मार्केट मधून डीलिस्ट झाली(Ruchi soya delisting). त्यावेळी कंपनीच्या शेअरची किंमत होती जवळपास 3.5 रुपये. आणि काही कालावधीनंतर जेव्हा कंपनी पुन्हा लिस्ट झाली तेव्हा शेअरची किंमत रु.17 पर्यंत वर गेली. म्हणजेच अल्पावधीतच शेअरची किंमत ५०० ते ६०० टक्क्यांनी वाढली.

आता तुम्हाला वाटलं असेल कि डिलिस्टिंगपूर्वी ज्यांच्याकडे रुची सोयाचे शेअर्स होते, त्यांचं तर नशीबच उघडलं. पण नाही, इथे मार्केट नियम माहिती नसल्याने तुमचा गैरसमज होतोय. खरेतर, पतंजलीने दिवाळखोरीत गेलेली रुची सोया खरेदी केल्यानंतर शेअर बाजाराला सांगितलं की ते किरकोळ गुंतवणूकदारांची हेअरकट  99 टक्क्यांनी कमी करणार आहे. इथे ‘हेअरकट’चा अर्थ म्हणजे कुणी कुणाचे केस कापण्याचे पैसे चुकविण्याबद्दल नसून ते म्हणजे ‘मूळ मूल्याऐवजी देण्यासाठी ठरणाऱ्या आणि मूळ रकमेतील फरक, असा आहे.

म्हणजेच इथे रुचीसोया प्रकरणात डिलिस्टिंगपूर्वी ज्यांच्याकडे कंपनीचे 100 शेअर्स होते, त्यांना या कंपनीची नव्याने लिस्टिंग झाल्यानंतर फक्त 1 शेअर मिळाला. यामुळेच कंपनीतील ९५ टक्क्यांहून अधिक शेअर्स प्रवर्तकांकडे आले आणि अगदी कमी शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांकडे होते. (patanjali ruchi soya share)

नियम महत्वाचे

इथे एक गोष्ट  लक्षात घेणे महत्वाचं आहे की जेव्हा एखादी कंपनी NCLT कडे जाते आणि ती कंपनी कोणी खरेदी करतं, तेव्हा कंपनीचा नवा मालक (प्रवर्तक ) किरकोळ गुंतवणूकदारांच्या शेअर्सच्या हिश्यात आपल्या इच्छेप्रमाणे हेअरकट (कपात ) ठेवू शकतो, किंवा या स्थितीत नव्या प्रवर्तकाने सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदारांना (रिटेल इन्व्हेस्टर्स) अगदी काहीच नाही दिलं तरी त्यावर हरकत  घेतली जाऊ शकत नाही. कारण नव्या प्रवर्तकांवर तसं काही बंधन नाही.

रुची सोयाच्या शेअर्समध्ये काय झालं होतं.

वर्ष 2002 मध्ये रुची सोयाच्या शेअरची किंमत 150 रुपये होती, जी 2008 मध्ये अगदी 15,000 रुपयांवर गेली. पुढील दीड वर्षात ती किंमत पुन्हा दोन हजार रुपयांपर्यंत खाली आली. आणि त्यानंतर पुन्हा सुमारे 2 वर्षांत हा भाव 13 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला. त्यावेळी अनेकांना हा चढ-उतार सामान्य वाटला, पण तपास यंत्रणांनी त्यात लक्ष घातलं आणि 2010 मध्ये सत्य बाहेर आलं.

ते म्हणजे, हा सारा खेळ मार्केटमधील काही ऑपरेटर्स खेळत होते. म्हणजे जेव्हा किंमत कमी होती तेव्हा या लोकांनी खोऱ्याने शेअर्स खरेदी करून किंमत वाढवली आणि मग वाढणाऱ्या किंमतीमुळे लक्ष वेधलं गेल्याने किरकोळ विक्रेत्यांनीही झपाट्याने शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. आणि किंमत खूप वाढली कि मग एका टप्प्यावर हे ऑपरेटर्स ‘कार्टेल’ आपले सर्व शेअर्स विकून बाजारातून बाहेर पडले. आजच्या भाषेतील  ‘पंप आणि डंप’ या प्रकारच्या खेळामुळे सर्वात जास्त देशोधडीला मात्र किरकोळ गुंतवणूकदार लागले.

आणि पतंजलीने अदानीला हरवून जिंकली बोली.. (How Patanjali bought ruchi soya)

रुची सोयाच्या दिवाळखोरी प्रक्रियेच्या वेळी, कंपनीवर सुमारे 12,000 कोटी रुपयांचे कर्ज होते. गौतम अदानी यांची कंपनी अदानी विल्मरने रुची सोया विकत घेण्यासाठी सुमारे 5,500 कोटी रुपयांची बोली लावली होती आणि ती जिंकली सुद्धा. पण तेव्हाच पतंजलीने आपला हुकमी एक्का टाकला.

पतंजलीने अदानीची ही बोली अवैध असल्याचा दावा करत म्हटलं की कुणा डिफॉल्टर ठरवल्या गेलेल्या व्यक्तीचे नातेवाईक कलम 29A अंतर्गत कंपनी खरेदीची बोली लावू शकत नाहीत. यामागचा संदर्भ असा की रोटोमॅकचे संस्थापक विक्रम कोठारी हे डिफॉल्टर आहेत आणि गौतम अदानी हे त्यांचे नातेवाईक लागतात. आणि हि पतंजलीचची हि हरकत ग्राह्य धरली गेली.

आणि अशा प्रकारे पतंजलीने आपल्या दुसर्या सर्वोच्च म्हणजे 4,350 कोटी रुपयांच्या बोलीसह रुचीसोया आपल्या खिशात टाकली. या व्यवहारात सुमारे 1,100 कोटी रुपये पतंजलीने स्वत: दिले, तर उर्वरित रक्कम त्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन उभारले. आता इथे गंमत काय आहे माहित आहे का ?

तर पतंजलीला रुची सोया विकत घेण्यासाठी त्याच बँकांनी कर्ज दिले, ज्यांचे पैसे रुची सोयामध्ये आधीच अडकले होते. या मध्ये ठरलेल्या व्यवहारांतर्गत बँकांना आपल्या रुची सोयामध्ये अडकलेल्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम बँकांना मिळाली, कारण इथेही बँकांना 50 टक्के हेअरकट ठरली होती.

असो, आता या कंपनीचा नवीन अध्याय सुरु झालाय.बाबा रामदेव यांनी आपल्या खाद्य आणि एफएमसीजी उद्योगाची विभागणी आणि वर्गीकरण या दोन कंपन्यांमध्ये केल्याचे जाहीर केलं आहे.( Baba Ramdev patanjali and ruchi soya )

तर मित्रानो हे असे होतात व्यवहार.पण लक्षात ठेवा आपण सर्वसामान्यांनी मात्र गृह कर्जांचे हफ्ते वेळेवर भरायचे असतात.

असो गंमतीचा भाग सोडा पण माहिती ( ruchi soya patanjali story in marathi) आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. आमचे इतर नवीन लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *