अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारताचा रिटेल डिजिटल रुपया (digital rupee – e₹-R) चा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. दोन टप्प्यांत होणार्या या प्रकल्पासाठी मध्यवर्ती बँकेने आठ बँकांची निवड केली आहे. पहिली सुरुवात भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांसह होईल. त्यानंतर इतर नऊ शहरांमध्येही त्याची खरेदी-विक्री करता येईल. (what is digital rupee in marathi)
यासह, भारत आता स्वतःचे ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित आधारित चलन सुरू करू पाहणाऱ्या निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे. अगदी अमेरिकेसारख्या देशाने अद्याप आपली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) लाँच केलेली नाही. यावरून या घटनेचं महत्व लक्षात येऊ शकतं.
अर्थात ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित असलं तरी हे बिटकॉईन सारखे क्रिप्टोचलन नव्हे हे सुद्धा लक्षात घ्या.
डिजिटल रुपया कुठे उपलब्ध असेल ?
ई-रुपी म्हणून ओळखला जाणारा डिजिटल रुपया प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या प्रकल्पानुसार सुरवातीस, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक’ या बँका भारतात डिजिटल रुपया जारी करू शकतात.
आगामी काळात, पुढील आणखी चार बँका बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक’ भारतात डिजिटल रुपये जारी करू शकतील. (what is e rupi in marathi )
सध्या येथे उपलब्ध होईल डिजिटल रुपया.
सध्या फक्त मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांत डिजिटल रुपया उपलब्ध असेल. त्यानंतर येत्या काळात अहमदाबाद, लखनौ, हैदराबाद, इंदूर, गंगटोक, गुवाहाटी, कोची, पाटणा आणि शिमला येथेही उपलब्ध होईल. (CBDC in marathi)
डिजिटल रुपया कुठे आणि कसा खरेदी करायचा?
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या एप किंवा वेबसाइटवरून डिजिटल रुपया खरेदी करू शकता. जे डिजिटल वॉलेट मध्ये साठवले जाऊ शकतील आणि द्वारेच त्याचे व्यवहार होतील. (Digital rupee wallet in marathi)
तथापि, हे अजून स्पष्ट नाही की या बँका वापरकर्त्यांना त्यांच्या विद्यमान एप्सवरून डिजिटल रूपये खरेदी करण्यास परवानगी देतील की केवळ डिजिटल रूपये हाताळण्यासाठी नवीन एप किंवा वेबसाइट जारी करतील. (how and from where to buy digital currency in marathi )
डिजिटल रुपया शेअर करता येईल का?
हो नक्कीच, क्रिप्टोप्रमाणेच मित्र परिवाराशी सामायिक केले जाऊ शकते. परंतु हे फक्त त्याच बँकांच्या एप्सद्वारे केले जाऊ शकते ज्यांना भारतात डिजिटल रुपया जारी करण्याचा परवाना देण्यात आला आहे. (how to use digital rupee in marathi )
ठळक बाबी.
- व्यवहार करण्यासाठी बँक खात्याची आवश्यकता नाही.
- मोबाईल वॉलेटप्रमाणेच यात पेमेंट करण्याची सुविधा असेल.
- तुम्हाला बँकेतून डिजिटल रुपया खरेदी करावा लागेल. त्यानंतर तुम्ही वॉलेट ते वॉलेट असे व्यवहार करू शकाल.
- नियुक्त केलेल्या बँकांमधून डिजिटल रुपयाची खरेदी करता येते.
- रिझर्व्ह बँकेसाठी नोटांच्या तुलनेत जारी करण्यास कमी खर्चिक, अर्थात किफायतशीर.
- डिजिटल रुपया जरी हे रोखीला पर्याय असलं तरी यातील व्यवहार रोखी प्रमाणे गुप्त राहणार नाहीत.
- नोटा चोरीला जाण्याचा किंवा फाटल्या जाण्यासारखी जोखीम इथे नाही.
- डिजीटल रुपयाचे बँक खात्यात क्रेडीट तसेच कॅशमध्ये सहज रुपांतरीत शक्य.
- परदेशात पैसे पाठवण्याचा खर्च कमी.
- UPI पेक्षा वेगळं कसं ?
- बँकांमध्ये सेटलमेंट सारखी प्रक्रिया नाही.
- ई-रुपया व्यवहारांसाठी इंटरनेट कनेक्शनची गरज नाही.
- बँक खाते असण्याची गरज नसल्याने आर्थिक समावेशन सुधारतं.
- डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज मिळणार नाही.
- सुरुवातीला मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या चार शहरांचा समावेश असेल.
- तसेच सुरवातीस या प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट या बँकांची निवड करण्यात आली आहे.