ICICI Lombard कडून कर्मचाऱ्यांच्या  मानसिक

भावनिक स्वास्थासाठी ‘संतुलन‘ हेल्पलाईन

icici  lombard
Image Source  : Glassdoor  

मुंबई,

ता.14 मे 2021 : सर्वसाधारण विमा क्षेत्रातील भारतातील आघाडीची खासगी विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थासाठी संतुलन हीहेल्पलाईन सुरु केली आहे. सदर हेल्पलाईन आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास कार्यरत राहणार आहे. या हेल्पलाईनवर प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध राहणार असून ते कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबत गोपनीयता बाळगणार आहेत.

सध्याच्या कोरोना महामारीमुळे अनेक व्यक्तींना मानसिक आणि भावनिक पातळीवर झालेल्या जबरदस्त आघाताची दखल घेत आयसीआयसीआय लोम्बार्डने भावनिक ताण कमी करण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्याचे ठरविले आहे. कोवीडमुळे आजारी पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने क्वारन्टाईन अॅसेसमेंट समिती (क्यूएसी) स्थापन केली आहे. या समितीत कंपनी नियुक्त डॉक्टर आहेत. कोवीड बाधित कर्मचारी आजारातून पुर्णपणे बरे होईपर्यंत हे डॉक्टर मार्गदर्शन, सल्ला आणि समुपदेशन करणार आहेत.

कंपनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता टिकवून ठेवताना वैयक्तिक कामकाजात संतुलन साधण्याचे आवाहन सातत्याने करत आहे. लवचिक कार्यपध्दतीत सकाळी नऊ आणि सध्याकाळी सातनंतर कोणतीही मिटींग घेतली जाणार नाही. दुपारी दोन ते तीन दरम्यान मौन वेळ पाळणे आणि आठवड्यातील साप्ताहिक सुट्टी अथवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मिटींग घेण्यास मज्जाव करण्यात आला असून या आधारे कमचाऱ्यांच्या उत्तम स्वास्थाला प्रोत्साहन दिले जात आहे.

कोवीड-19 मुळे आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा तणाव कमी करण्यासाठी किरकोळ आणि वैद्यकीय रजांव्यतिरिक्त गरजेनुसार त्यांना कंपनीने अतिरिक्त रजा देऊ केली आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्डने गेल्या काही महिन्यात कामकाजासंर्दभात कायमस्वरुपी हायब्रीड मॉडेलची घोषणा केली आहे. त्यात 50 टक्के कर्मचारी हे कार्यालयाऐवजी त्यांच्या सोयीनुसार स्थानिक ठिकाणांहून काम करणार आहेत.

कोवीडचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेत आयसीआयसीआय लोम्बार्डने कोवीडने पॉझिटिव्ह असलेल्या कमचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन आगाऊ देणार असल्याची घोषणा गेल्याच आठवड्यात केली. या आगाऊ वेतनाची परतफेड कर्मचारी नंतर सहा अथवा बारा मासिक हप्यात करु शकणार आहेत.

विमा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी खालील अतिरिक्त उपाययोजनांची घोषणा केली आहे.

⦁ कोरोना संसर्ग झालेला कर्मचारी घरीच उपचार घेत असल्यास वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उभारण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चापोटी त्याच्या कुटूंबातील प्रतिसदस्यासाठी जास्तीत जास्त दहा हजार रुपये मदत केली जाणार आहे. भरपाईचा हा लाभ पत्नी, 25 वर्ष वयापर्यंतचे दोन अपत्य आणि त्याच्यावर अवलंबून असलेले पालक यांनाही मिळणार आहे.

⦁ आपले सर्व कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील सदस्यांच्या लसीकरणाचा खर्च कंपनी उचलणार आहे. या लसीकरणाला वेग देण्यासाठी देशातील आरोग्य संस्थांबरोबर भागीदारी केली जात आहे.

⦁ कर्मचाऱ्यांना चार लाख रुपयांचा फॅमिली फ्लोटर विमा आणि तीन लाख रुपयांचे कॉर्पोरेट पातळीवरील अतिरक्त विमा कवच कंपनीने दिले आहे. या विमा योजनेत कर्मचारी, त्याची पत्नी, 25 वर्ष वयापर्यंतचे दोन अपत्य आणि पालक यांचाही समावेश राहणार आहे.

⦁ कोवीडमुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्य़ास आणि कंपनीत उपलब्ध असलेल्या पदासाठी सक्षम असल्यास तिला सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

⦁ मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाला कंपनी त्याची ग्रॅच्युईटी आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणार आहे. ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सेवेचा आवश्यक कालावधी पुर्ण केलेला नसला तरीही संबंधित रक्कम त्याच्या कुटूंबाला दिली जाईल.

⦁ आयसीआयसीआय लोम्बार्डने स्वतः पुढाकार घेत सुरु केलेल्या आयएल टेककेअर अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी मदत, मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून टेलीफोनच्या माध्यमातून दिली जाणारी आयएल हॅलो डॉक्टर ही वैद्यकीय सेवा, ऑनलाईन पध्दतीने दावे सादरीकरण आणि त्याचा मागोवा, न्युट्रीशन, डायट यासारख्या मुद्दांवर चॅट वुईथ एक्सपर्ट, प्रतिकारशक्ती वाढीला प्रोत्साहन आणि आरोग्य जोखीमेची तपासणी या कोवीडशी संबंधित सेवांचाही लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

सध्याच्या या आव्हानात्मक परिस्थितीत, एक पाऊल आणखी पुढे टाकत आपल्या कर्मचाऱ्यांना सहाय्य करणे आयसीआयसीआय लोम्बार्डला गरजेचे वाटते. आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्याबरोबर त्यांच्या कुटंबाचे स्वास्थ टिकविण्याच्या दिशेने कंपनी प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *